शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या मुख्य गृहसचिवांशी चर्चा , अनिकेत कोथळे खूनप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी : पतंगराव कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:33 IST

कडेगाव : सांगलीत पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकाºयांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला.

कडेगाव : सांगलीत पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकाºयांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी कोथळेचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. खाकी वर्दीला काळिमा फासणाºया आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आमदार पतंगराव कदम यांनी गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याकडे केली.मुंबई येथे मंत्रालयात कदम यांनी गृह विभागाचे मुख्य सचिव श्रीवास्तव यांची भेट घेऊन चर्चा केली. त्याबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, कामटे आणि त्याच्या सहकाºयांनी अतिशय क्रूर कृत्य केले आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्री, मटका, सावकारी असे धंदे राजरोस सुरू आहेत. चोºया, दरोडे, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहेत. हप्ते घेणारे, गुन्हेगारांना आश्रय देणारे, कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले पोलिस अशी पोलिसांची प्रतिमा झाली आहे, सांगलीतील घटनेने पोलिसांची बदनामी झाली आहे. यामुळे राज्याच्या गृह विभागाने कठोर पावले उचलून सांगली पोलिस प्रशासनात योग्य ते बदल केले पाहिजेत, असे गृह सचिवांना सांगितले आहे.खरे गुन्हेगार, गँगवॉरमधील गुंड पोलिसांना सापडत नाहीत आणि निष्पाप व्यक्तींवर मस्तवाल अधिकारी दादागिरी करतात. जनतेची विश्वासार्हता पोलिसांनी गमावली आहे.ठोस उपाययोजना!गृह विभागाचे सचिव श्रीवास्तव यांनी गृह विभागाच्या संबंधित प्रमुख अधिकाºयांशी तात्काळ संपर्क साधला. याबाबत स्वत: लक्ष घालून योग्य त्या ठोस उपाययोजना तात्काळ करीत असल्याचे आश्वासन त्यांनी कदम यांना दिले.मुंबई येथे गृह विभागाचे मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्याशी सांगली घटनेबाबत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी चर्चा केली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसSangliसांगली